अवैध्य अवजड वाहन वाहतुकी विरुद्ध मनसेचा आंदोलनाचा इशारा अवजड वाहतुकी विरुद्ध कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  परिवहन आयुक्त यांना भेटुन मनसे जिल्हाअद्यक्ष अतुल भगत यांनी दिला. उरण-पनवेल भागात मोठ्या प्रमाणात सीएफएस असल्या कारणाने अवजड वाहनांची वर्दळ पण खूप असते.परंतु उरण-पनवेल तालुक्याअंतर्गत रस्त्यांना फक्त १५ टनची परवानगी अताना ३०-४० टन माल भरलेले ट्रक चालत असतात आणि अपघातांना कारण बनतात.प्रशासनाच्या ह्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांना आपला जीव गमवावा लागतो. प्रशासनाने आता कोणतीही कारवाई न केल्यास भव्य आंदोलन करण्यात येईल असा इशारा अतुल भागात यांनी दिला. निवेदन देताना सोबत उपजिल्हाद्यक्ष अतुल चव्हाण नविन पनवेल  शहराध्यक्ष पराग बालड उपस्थित होते.