उरणकरांना लवकरच पाईपलाईनने गॅस पुरवठा 

उरण शहराला पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले .ओएनजीसीमधील नवीन गॅस प्लांटचे उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले .  पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा ही उरणमधल्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.