उरण तालुक्यात  वाहतूक कोंडी एक मोठी समस्या !

उरण-तालुक्यात-वाहतूक-कोंडी
उरण तालुक्यात वाहतूक कोंडी
 
उरण तालुक्यात दिवसेंदिवस  वाढत असलेल कंटेनर यार्ड ,गोडाऊन  आणि त्यामुळे वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ वारंवार उरण मधील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करत आहेत .अशा वाहतूक कोंडीमुळे उरण मधून  पनवेल,नवी-मुंबई,मुंबईकडे नोकरी किंवा दुसर्या कोणत्याही कारणाने प्रवास करणाऱ्या जनतेला हाल सहन करावे लागत आहेत. तसेच अवजड वाहनांच्या  वाढत्या रहदारीमुळे मागील काही दिवसात अपघतांच्या संखेत मोठी वाढ झाली आहे आणि कितेकांना आपला जीव गमवाला लागला आहे.
 
उरण तालुक्याचा औद्योगिकरण झपाट्याने होत असून येथील प्रशासन वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष करत आहे.वाहतूक कोंडीला रस्त्यांची दुर्दशा आणि अर्धवट कामे जबाबदार आहेत असा इथल्या जनतेच मत आहे. गव्हाणफाटा-चिरनेर रस्ता जिथे उरण-पनवेल मार्गाला मिळतो तेथील अरुंद पुलामुळे नेहमी वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागते.तसेच जासई गावाजवळ रखडलेल रस्त्याच काम उरण-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडीचा कारण बनत आहे.
अशा वाढत्या औद्योगिकरणावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने, जेएनपीटीने तसेच सिडकोने इनफ्राप्रोजेक्टच्या माध्यमातून आजपर्यंत  कोणतीच सुधारणा केली नसल्याने तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.तरी शासनाने ,वाहतुक विभागाने  यावर उपाययोजना करावी.