जेएनपीटीतून 7 लाखांचा माल चोरणाऱ्या ट्रेलर चालकास साथीदारासह अटक 

ओवरसीज पॉलीमर कंपनीने परदेशातून आयात केलेले प्लास्टिकचे दाणे जेएनपीटीमध्ये आले होते.  जेएनपीटीतून प्लास्टिकच्या दाण्यांचे ५ कंटेनर खोपट्याच्या गोदामात पाठविण्यात आले होते.त्यातील चार कंटेनर  मालासहत गोदामात पोहोचले ,परंतु एका कंटेनर  मध्ये माल कमी असल्याचे आढळले ,त्यामुळे पोलीसांकडे तक्रार करण्यात आली.पोलीसांच्या तपासात कंटेनरमधील काही खोके नवघर परिसरात काढून घेतल्या आणि नंतर पळस्पे परीसारात लपवून ठेवण्यात आल्या.त्यानुसार  ट्रेलर चालक सतनाम आणि त्याचा साठी इम्रान यांना अटक करण्यात आली आहे.