पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना लाच घेताना अटक 

अविनाश पाटील यांनी अवैध तेलाचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी रसायनी येथील एका व्यावसायिका कडून 2 लाख रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या पथकाने त्यांना रंगेहाथ  पकडले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अविनाश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.