मनसेच्या आंदोलनाला मोठे यश – बालमेर लॉरी ते बीपीसीएल रस्त्याचे डांबरीकरण 

गेल्या वर्षी २०१४ रोजी रस्त्यात खड्डे या विषयी मनसे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांचा नेतृत्वाखाली सिडको विरोधात भेंडखल फाटा येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून सिडकोने भेन्द्खल हद्दीतील बालमर लॉरी ते बीपीसीएल या ७ किमी रस्त्याचे टेंडर काढले हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा झाला होता या रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे होवून काही खड्डे तर तलावात रुपांतर झाले होते शिवाय या रस्त्यावर कंटेनर वाहतुकीची मोठी वर्दळ २४ तास चालू असते त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागत होते
आजच्या घडीला या रस्त्याचे डांबरीकरण करून हा रस्ता पूर्णपणे सुसज्ज करण्यात आला आहे.