रायगडमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी 

अवकाळी पाऊस
 
रायगडमध्ये अनेक भागांत मंगळवारी संध्याकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसाबरोबरच वादळीवारे आणि वीजांचा कडकडाट  यामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांची एकच धांदल उडाली.
रायगड जिल्ह्यात पनवेल ,महाड,पोलादपूर,रोहा आणि माणगाव तालुक्यांना मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने  झोडपून काढले.रोहा व आसपासचा परिसरात गारांचा पाऊस झला. वादळी वाऱ्याबरोबर पावसाचा दमदार सारी पडल्याने रस्त्यावर काही झाडे कोलमडून पडली,काही घरांची छपरे उडाली.
अशा पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे  बागायती शेतीचे यंदाच्या वर्षी मोठे नुकसान झाले आहे.