लग्नसराईत सोनसाखळी चोरांची वाढती दहशत

नवी मुंबई,पनवेल,उरण परिसरात चोरी ,घरफोडी ,वाहन चोरी व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत आहेत. ह्या भागात रोज ३ ते ४ ठिकाणी दागिने हिसकावण्याच्या घटना घडत आहेत .नवी मुंबई परिसरात सीसीटीवी कॅमेरे ,नाकाबंदी असून पण चोऱ्यांच्या प्रमाणात कोणतीही कमी आलेली नाही.ह्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी रात्री बेलापूर गावात चक्क पोलीस शिपायाच्या घरामध्ये 2 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली . ह्या घटनेनंतर पोलिसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ह्या गुन्ह्यांना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.