विंधणे गावानजीक  ट्रेलर पलटी,सुदैवाने जीवीतहानी टळली.

accident near vindhane village

चिरनेर गव्हाणफाटा रोडवर विंधणे गावाजवळ अतिवेगामुळे चालकाचा नियंत्रण सुटून ट्रेलर पलटीझाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चिरनेर कडून येत असताना विंधणे गावाच्या अलीकडे असलेल्या उतरणीवरून वेगाने येत असल्याने  ट्रेलर चालकाचा पुढे असलेल्या धोकादायक वळणावर गाडीवरचा नियंत्रण सुटल्या कारणाने ट्रेलरची ट्रॉली  पलटी झाली .सुदैवाने आसपास कोणी नसल्याकारणाने दुखापत किंवा जीवित हानी टळली.