विंधणे ग्रुप-ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर यांची निवड 

२० मे  रोजी पार पडलेल्या विंधणे ग्रुप-ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर ,रा.बोरखार यांची बिनविरोध निवड झाली आहे.शिवाजी महाराजांकडे फारच थोडे सैन्यबळ आणि शास्त्रास्ते होती परंतु ज्याप्रमाणे कुटनीतीचा  वापर करून बलाढ्य मोघल आणि आदिलशाहीला मात दिली त्याच प्रमाणे महाराजांचा आदर्श घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शेकापला  फक्त १ जागा असताना मात देऊन विंधणे ग्रुप-ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला . एकूण १३ मधून कॉंग्रेस -राष्ट्रवादीकडे   ७ , शेकापकडे  ४ ,अपक्ष १  आणि शिवसेनेकडे  फक्त १ जागा असताना महाराजांप्रमाणे कुटनीतीचा योग्य वापर करून शिवसेनेच्या सौ.वैशाली म्हसकर विंधणे ग्रुप-ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या . कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विंधणे गावातलेच असून १३ मधून  आवश्यक ७ जागा असताना सुद्धा शिवसेनेचा सरपंच झाला अशी एकच चर्चा उरण परिसरात आहे.