विरारमध्ये  बीएमडब्लू कारची अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू 

विरारमध्ये एका बीएमडब्लू कारने अॅक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अॅक्टिव्हाचे दोन तुकडे झाले आणि स्कूटरवरील स्त्री आणि पुरुषाचा जागीच मृत्यू झाला.
विरार पश्चिम येथील पुरापाडा येथे रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर बीएमडब्लूचा चालक कार तिथेच सोडून फरार झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली.
दरम्यान, अर्नाळा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.