हिट अँड रन प्रकरणात सलमान खान दोषी 


२००२ साली दारूचा नशेत गाडी चालवत असताना  फुटपाथवर  झोपलेल्या लोकांना टोयोटो लँडक्रुझरखाली चिरडले होते. त्यामध्ये एकाचा मृत्यु व चौघांना दुखापत झाली होती. त्या प्रकरणी आज बुधवार दिनांक ०६/०५/२०१५ रोजी सलमान खानला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सकाळी ११:३० चा सुमारास अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी .डब्लू .देशपांडे यांनी हा निकाल दिला.पुराव्यांवरून असे स्पष्ट झाले आहे की सलमान खानच गाडी चालवत होता. १३ वर्षापूर्वीच्या ह्या खटल्यात न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरविलअसून  त्याला 5 वर्ष तुरुंगवासाची सजा सुनावली आहे.