भुवनेश्वर, दि. १४ – भारतात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या न्युक्लर अग्नी-१ या अण्वस्त्रवाह क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी करण्यात आली. जमीनीवरुन जमीनीवर ७०० कीमी पर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. भारतीय लष्कराने आज सकाळी ९:११ वाजता अब्दुल कलाम
बेटावरुन (व्हीलर बेटे) यशस्वी चाचणी घेण्यात आली.
१२ टन वजन व १५ मीटर लांबी असलेल्या अग्नि-१ क्षेपणास्त्रावरुन १ टनापेक्षा जास्त वजनाची स्फोटके वाहून नेता येणे शक्‍य आहे. याचबरोबर, स्फोटकांचे वजन (पेलोड) कमी करुन क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येणेही शक्‍य आहे. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यामधील अग्नि हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
या क्षेपणास्त्राच्या प्रवासमार्गाचे अत्याधुनिक रडार व नौदलाच्या जहाजांच्या सहाय्याने काटेकोर निरीक्षण करण्यात आले असे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.