गेल्या काही वर्षा प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे  लागत आहे.त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी यावर्षी होळीत रेन डान्स वर बंदी आणली आहे. यंदाची होळी ही कोरडी होळी साजरी करावी असे आव्हाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

धुळवडीच्या दिवशी पाण्याचे फुगे फेकण्याचे प्रकार देखील दर वर्षी समोर येत आहेत.या गोष्टीला सर्व थरांतून विरोध दर्शवला जातो.याही वर्षी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती केली जात आहे की आपल्यासमोरील पाणी टंचाई लक्षात घेऊन कृपया या होळीला पाण्याचा अपव्यय टाळावा आणि होळीचा आनंद लुटावा.