नवी मुंबई ला लागुनच असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा परिसराचा विकास लवकरच शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे.कर्नाळा हा परिसर वन कायद्या अंतर्गत येतो त्यामुळे  त्या कायद्याचे पालन करूनच कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. तसेच पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन निर्णय घेणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

                   पनवेल शहराचा विकास हा झपाटयाने होत आहे आणि त्यात अजून भर म्हणजे ४३ कोटी रुपये खर्च करून पनवेल शहरामध्ये चार मुख्य  रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कामाचे भूमिपूजन करताना दिली.यामध्ये ठाणा नाका, उरण नाका ते टपाल नाका, विश्राळी नाका या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.पुढील काळात पायाभूत सुविधांकरिता पनवेल शहराला निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.