कर्मचार्‍यांनी अडवणूक आणि छळणवणूक करणारे कृषी विभागातील अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. भगवान सहाय यांच्या उद्दामपणाची मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्याकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
मंत्रालयात कृषी विभागात सहाय्यक सचिव या पदावर आर. जी. घाडगे हे काम करतात तर अप्पर मुख्य सचिव पदावर भगवान सहाय कार्यरत आहेत11 ऑगस्टला घाडगे यांच्या मुलाचा त्यांना फोन आलाघाडगेच्या मुलाच्या त्यांच्या बायकोशी वाद झाला होताघरी या नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी मुलानं घाडगेंना दिलीघाडगेंनी घरी जाण्यासाठी सहाय यांच्याकडं परवानगी मागितलीघाडगे यांना घरी जाण्यास उशीर झाला, त्यांच्या मुलानं आत्महत्या केलीघाडगे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी सोलापूरला गेलेघाडगेंनी अंत्यसंस्काराला जाण्यासाठी रजा का मागितली नाही अशी भगवान सहाय यांच्याकडून लेखी विचारणा