काल सह्याद्री अतिथीगृहात गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली .यात मुंबई , ठाणे , पुणे , नवी मुंबई विभागाचे पोलिस आयुक्त , महानगरपालिका आयुक्त व संबधीत प्रशासनाचे प्रमुख अधिकारी व पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने अशी मागणी केली की , गणेशोत्सवादरम्यान बाजारात भाविकांना हार व पुजेची फुले विकत घेताना मोठ्या प्रमाणावर त्यांचे दर ईतर दिवसांपेक्षा जास्त असतात व ती फुले व हार महाग भावाने विकले जातात . सर्व भाविकांच्या वतीने या फुलांच्या दरांवर नियंत्रण आणण्यात यावे जेणेकरुन गणेशभक्तांच्या खिशावर कमी भार पडेल अशी व्यवस्था करावी व या दरांवर नियंत्रण आणण्यात यावे अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यात आली व या मागणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
उत्सवादरम्यान सर्वात जास्त झळ भाविकांना बसते, फुलं व्यापारी शंभर पट दर वाढवून लोकांची लूटमारच करतात यावर सरकारने अंकुश ठेवायला हवा असे मत  युवाशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पत्रकार शीतल करदेकर-सरचिटणीस समन्वय समिती च्या मागणीला पाठिंबा देताना केली.