अहमदनगर च्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातच चोरी. गेली दोन दिवसांपासून या पोलीस ठाण्याच्या आतील भागात आरोपी कोठडीसमोरचे चंदनाचे झाड गायब झाले आहे. यावरून पोलीस किती दक्ष आहेत हे दिसून येतेय.                                  
पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण चळवळीला प्रोत्साहन देण्याची चळवळ सुरू आहे मात्रा नगरमध्ये पोलीस ठाण्यातल्याच झाडाची त्यातही चंदनाच्या झाडाची कत्तल करण्यात आली की चोरी झाली आहे याचा शोध लागण्याची गरज आहे. चोराला व कत्तलखोराला सजा व्हायला हवी.पोलीस ठाण्यातील हे झाड नक्की कोणाच्या इच्छेनुसार बळी गेले याचा शोध घ्यायला  हवाच स्थानिक जागरूक पत्रकार दादा सोनावणे यांनी एसपी त्रिपाठी यांच्याशी संवाद साधला असता याप्रकरणी डिवायएसपी भोईटे चौकशी करून रिपोर्ट देतील असे सांगितले.                         
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे मुख्य अधिकारी साहेबराव कडनोर हे पालकमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने श्रीगोंदा पोलीस ठाणे परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आवर न घालू शकणारे साहेबराव यांच्यावर या प्रकरणी ही पाठीशी घातले जाईल ही शक्यता नाकारता येत नाही