पालिकेच्या कारभारात लोकप्रतिनिधींना स्थान नसल्याची खदखद या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. दोन पानी पत्रात आयुक्तांच्या कारकिर्दीतील कामांचा पाढाच वाचण्यात आला आहे. आयुक्त शिंदे यांनी केलेल्या कामांचा हवाला देत उपायुक्त संध्या बावनकुळे आणि जमीर लेंगरेकर यांच्या कामाबाबतही उहापोह करण्यात आला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वेगवेगवेळ्या कामांमुळे दुखावलेल्या कडून हे पत्र आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून आपण निवडून आलो असतानाही आयुक्तांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबाबत या पत्रात संताप व्यक्त करण्यात आला आहे. आयुक्तांनी आपल्या कामाच्या पध्दतीत सुधारणा केली नाही, तर जीवे ठार मारल्याशिवाय पर्याय नसल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.
आपण अशा धमकीला घाबरत नसून पनवेल पालिकेतील पारदर्शक कारभार असाच पध्दतीने सुरू राहणार असल्याचे वक्तव्य आयुक्त डाॅ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. या पत्रानंतर पालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची आता आयुक्तांच्या दालनात बैठक सुरू आहे.