वन विभागाची परवानगी मिळाल्याने ४ हेक्टर जागेच्या संपादनाचा प्रश्न सुटला
नेरुळ-उरण रेल्वेमार्गातील चार हेक्टर वन जमिनीचा अडथळा दूर झाला आहे. या मार्गाच्या नेरुळ-खारकोपपर्यंतच्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु खारकोपरपासून पुढील मार्गासाठीच्या भूसंपादनात अडचणी येत होत्या. वनजमिनीच्या ४ हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. नुकतीच वन विभागाची परवानगी मिळाल्यामुळे मोठा अडथळा दूर झाला आहे.