उरण दि 3.02.2018 उरणमधील जेष्ठ नागरिकांना उत्तर काशीतील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे,जेष्ठ नागरिकांच्या धार्मिक मनोकामना पूर्ण करता याव्यात यासाठी उरणमधील महेश बालदी (Mahesh Baldi) मित्र मंडळ तर्फे फ़क्त उरण तालुक्यातील जेष्ठ नागरिकांसाठी 23 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 दरम्यान उरण ते उत्तर काशी तीर्थयात्रेचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

उरण ते उत्तर काशी तीर्थयात्रेत काशी विश्वेश्वर,काशी दशाश्व मेध घाट,अयोध्या राम जन्मभूमी,हरिद्वार ऋषिकेश,कृष्ण जन्मभुमी-मथुरा वृंदावन यासारख्या प्रसिद्ध धार्मिक तीर्थ क्षेत्रांचा समावेश आहे.नियम व अटिंचे पालन करणाऱ्या जेष्ठ नागरिकांनाच यात सहभागी होता येणार आहे.ही तीर्थ यात्रा फक्त उरण तालुक्यातील 60 वयोवर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी आहे.या यात्रेत वैद्यकीय अधिकारी व युवक स्वयंसेवकांची फौज तैनात असून जेष्ठ नागरिकांची नाव नोंदणी सुरु असल्याचे नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी उरणमधील जेष्ठ नागरिकांनी भाजपचे नगरसेवक-पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन महेश बालदी मित्र मंडळ उरण तर्फे करण्यात आले आहे.