उरण – उग्र आमरण उपोषण, उरण पनवेल जे एन पी टी परिसरातील विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे त्याचा विरोधात ७/११/२०१७ रोजी कुमार अजित म्हात्रे या युवा कार्यकर्त्याने आमरण उपोषणाचे शास्त्र उगरले, 2 दिवसाच्या उपोषण नंतर उरण तहसीलदार यांचा सोबत 29/11/2017 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने रास्त असलेल्या मागण्या कागदो पत्री मान्य केल्या परंतु नोव्हेंबर 2017 ते मार्च 2018 या 5 महिन्याचा कालावधी नंतरही सुस्त प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कृती कार्यवाही न करता येथील समाजाला उपहासात्मक वागणुक दिल्यामुळे कु.अजित म्हात्रे याने पुन्हा एकदा सामाजिक जाणिवेच्या बंधीलकीतून उग्र आमरण उपोषण आज दिनांक 12 मार्च 2018 रोजी सुरू केले आहे व जोपर्यंत आपण केलेल्या लोक हितार्थ मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार केला आहे अशा युवा कार्यकर्त्याला उरण सामाजिक संस्थेच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी भेट देऊन कृतिशील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे व भविष्यात अजित सारख्या कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास उग्र स्वरूपाची भूमिका घेण्याचे ठरविले आहे