कावीळ रूग्णांची सेवा करणारे धुतुम गावचे रहिवासी आणि उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र कृष्णा ठाकुर यांचे गुरुवारी (२८/०५/२०२०) रात्री दुःखद निधन झाले असून कोरोनाचे संकट आणि जास्त लोकांना जमण्याची परवानगी नसल्यामुळे रात्रीच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सुरु केलेली कावीळ रुग्णांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवली होती आणि त्यांच्या ह्या सेवे मुळे धुतूम गाव फक्त उरण-पनवेल नाही तर पूर्ण रायगड, नवी-मुंबई आणि मुंबई मध्ये कावीळ उपचारासाठी प्रसिद्ध आहे.