कोरोना साथी नंतर जवळपास १२ लाख कामगारांनी राज्यातुन स्थलांतर केले असल्यामुळे महाराष्ट्रात कामगारांचा तुटवडा निमार्ण झाला आहे.

असंगठित कामगार आयुक्त पंकज कुमार यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्पादन क्षेत्रात स्थलांतरांवर मात करण्याची क्षमता आहे. एमआयडीसीने सांगितले की, परप्रांतीय केवळ १०% उत्पादन, ६५ टक्के बांधकाम आणि २५ टक्के सेवा क्षेत्रात गुंतलेले आहेत.
हा सर्वेक्षण उद्योगावर झालेला एकूण परिणाम जानण्या साठी केला होता. हे सर्वेक्षण केवळ असंघटित कामगारच नाही तर इतर उद्योगात आवश्यक असणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी आहे, असे एमआयडीसीने म्हटले आहे.

महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, सर्वोच्च राज्य उद्योग संस्था यांनीही सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात अशीही पुष्टी केली गेली आहे की कामगार तुटवडा भरून काढला जाऊ शकतो कारण मोठ्या प्रमाणात कमतरता हि अकुशल आणि अर्ध-कुशलशी कामगारांशी संबंधित आहे.

एमआयडीसीच्या संकेतस्थळावरुन हे सर्वेक्षण लोकडाऊन दरम्यान मंजूर झालेल्या राज्यभरातील ८६,००० युनिट्सचे होते. या सर्वेक्षणात ५३,००० युनिट्स कार्यरत असल्याचे आढळले. त्यानंतर एमआयडीसीने युनिट्सना कार्यबलाबद्दल विचारणा करणारा बल्क मेल पाठविला.

केवळ १२००० युनिट्सनी प्रतिसाद दिला की ही कमतरता मोठी समस्या नव्हती. या युनिटमध्ये १२,००० कामगार आवश्यक आहेत असे म्हटले गेले: “५०% अकुशल श्रेणी, २५ – ३०% अर्ध-कुशल आणि सुमारे २०% कुशल. “

कौशल्य विकास विभागाकडे प्रशिक्षण घेतलेल्या १७ लाख लोकांचा डेटाबेस आहे त्यातील पाच लाख लोकांकडे रोजगार असून, कामगारांचा तुटवडा भरून काढला जाऊ शकतो , असे एमआयडीसीने म्हटले आहे