जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) उरणमधील बोकाडविरा येथील प्रशिक्षण केंद्रात १२० बेड आणि रुग्णवाहिका सेवा असलेल्या कोविड -१९ रुग्णालयात रूपांतर केले आहे.

स्थानिक रूग्णांवर उपचार करण्यासाठी जेएनपीटीने ही सुविधा राज्य सरकारकडे तात्पुरती सोपविली आहे. जेएनपीटी जवळपासच्या गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबवित आहे आणि सरपंचांना थर्मल स्कॅनर वितरीत करीत आहे.

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जेएनपीटी आपल्या विस्तारित कुटुंबाप्रती असलेली आपली भूमिका आणि जबाबदारी याबद्दल खूप जागरूक आहे आणि त्यांच्यासाठी वचनबद्ध आहे. आमचे प्रशिक्षण केंद्र कोविड -१९ रुग्णालय म्हणून राज्य सरकारच्या स्वाधीन करून आम्ही या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी स्थानिक समुदायाची तयारी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला खात्री आहे की कोविड -१९ विरुद्ध हा लढा आम्ही मिळून जिंकू.

आवश्यक सेवा पुरवण्यासाठी लॉकडाउनमध्ये सुद्धा जेएनपीटी कार्यरत आहे. बंदर अधिकारी आपल्या कर्मचार्‍यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत आहेत. तसेच नियमितपणे बसेसचे निर्जंतुकीकरण करणे, टाउनशिपमध्ये टर्मिनल कर्मचार्‍यांना आणि ड्रायव्हर्सना निवास व्यवस्था करणे, ट्रक चालकांची तपासणी करणे आणि त्यांना जेवण पुरवणे या गोष्टी नियमितपणे केल्या जातात.