कोंडा, पांढरे केस आणि केसगळती या समस्यांमुळे जवळपास सर्वजण त्रस्त आहेत. रोजची धावपळ, बदलती जीवनशैली, वेळी अवेळी खाणेपिणे, वारंवार केमिकल प्रोडक्टचा होणारा वापर आणि वाढते प्रदूषण यामुळे केसांचं भरपूर नुकसान होतं. योग्य पद्धतीनं केसांची काळजी घेतली नाही तर केस पातळ होणे तसंच केसगळतीचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. यासाठी दिवसभरातील काही वेळ आपल्या केसांच्या देखभालीसाठी नक्की काढा.
खराब झालेल्या केसांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी. यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही, घरामध्येच तुम्हाला कित्येक सामग्री सहजरित्या सापडतील. स्वयंपाकघरातील तीन गोष्टी तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी वरदान आहेत. यांचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास केस मजबूत, मऊ आणि लांबसडक होतील. केसांसाठी कसा करायचा रामबाण घरगुती उपाय? जाणून घेऊया सविस्तर माहिती
कढीपत्त्याचे तेल
स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा (curry leaves for hair) वापर केला जातो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये केसांसाठी पोषक असलेले घटक भरपूर प्रमाणात आहेत. कढीपत्त्याचा औषध म्हणून देखील उपयोग केला जातो. जेवणामध्ये कढीपत्त्याचा वापर करण्याव्यतिरिक्त तुम्ही यापासून केसांसाठी तेल तसंच हेअर पॅक देखील तयार करू शकता. एका पॅनमध्ये कढीपत्त्याची काही पाने घ्या.
(आठवड्याभरात केसांच्या समस्या होतील कमी, भृंगराज तेलानं असा करा मसाज)
केस होतील मऊ
यानंतर नारळाचे तेल (अंदाजे आठ कप)(coconut oil for hair) त्यामध्ये मिक्स करा. कमीत कमी १० मिनिटे हे तेल गरम होऊ द्यावे. गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यावे. रात्री झोपण्यापूर्वी या तेलानं आपल्या केसांचा मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू आणि थंड पाण्याने केस चांगले धुऊन घ्या. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा हे तेल केसांना लावा आणि हलक्या हातानं मसाज करा.
(Hair and Skin Care केस आणि त्वचेसाठी वरदान आहे गूळ, मिळतील जबरदस्त फायदे)
कांद्याचा रस
कांद्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर असते. हा घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहे. केसांसाठी कांद्याच्या रसाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास केस मजबूत होतील. केसांशी संबंधित सर्व समस्या या उपायामुळे कमी होतील. हा उपाय करण्यासाठी एक मोठा कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. यानंतर कांद्याचा रस एका भांड्यामध्ये गाळून घ्या. एखाद्या तेलामध्ये कांद्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण केस आणि टाळूला लावा.
(Hair Care Tips केसांना कधी आणि किती प्रमाणात तेल लावायचे, आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण माहिती)
कांद्याचा रस लावताना हे लक्षात ठेवा
३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे मिश्रण केसांमध्ये ठेऊ नका. कारण कांदा हे एक कूलिंग एजंट मानले जाते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. कांद्याचा रस नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल. एवढंच नाही तर केसांमधील कोंडा कमी होऊन नैसर्गिक चमक देखील मिळेल.
(Hair Wash: गरम पाण्यानं केस धुण्याची चूक करू नका,पडू शकतं टक्कल)
दही
दही केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही वरदान आहे. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन ए चे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे घटक केस तसंच त्वचेसाठी पोषक आहेत. आठवड्यातून दोन वेळा केसांना दही लावावे, हा उपाय केल्यास केसांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसून येतील. कोंड्याच्या त्रासामुळे हैराण झालेल्यांनी केसांना दही लावावे. दह्यातील पोषक घटकांमुळे केसांवर चमक येते. यामुळे केसांची वाढ देखील चांगली होते.
(आठवड्यातून एकदा मेथी पॅक केस आणि त्वचेवर लावा, मिळतील जबरदस्त फायदे)
केसांना दही लावण्याची पद्धत
एक मोठा चमचा दही घ्या आणि त्यामध्ये लिंबू रस मिक्स करा. हे मिश्रण २० ते ३० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. हा उपाय २० दिवस करा. दह्यामुळे केसांना मॉइश्चराइझर मिळते.
Note : केस आणि त्वचेसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.
(केसगळतीतून ७ दिवसांत मिळेल सुटका, जाणून घ्या एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत)