आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज 15 जून पहाटेपासून मध्य आणि पश्चिम मार्गावर ही लोकल सेवा सुरु करण्यात आली. दोन्ही मार्गावर तब्बल 346 लोकल फेऱ्या केल्या जाणार आहेत.

राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून (15 जून) सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील.

सर्वसामान्य प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे.

शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचं तिकीट मिळेल, तसंच प्रवास करता येईल.