अयोध्याचे राम मंदिर १६१ फूट उंच असून मंदिराच्या आर्किटेक्टने म्हटले आहे की, १९८८ मध्ये तयार केलेली मूळ रचना १४१ फूट उंच होती. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य व्हीआयपी यजमानांच्या उपस्थितीत भव्य समारंभानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे.

“आधीची रचना 1988 मध्ये तयार केली गेली होती. ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. लोक मंदिरात जाण्यासही खूप उत्साही आहेत. त्यामुळे आम्हाला वाटले की त्याचा आकार वाढविला पाहिजे. सुधारित डिझाइननुसार, मंदिराची उंची १४१ फूट वरून १६१ फूट करण्यात आली आहे, असे मंदिराचे मुख्य वास्तुविशारद आणि सी सोमपुरा यांचे पुत्र निखिल सोमपुरा यांनी सांगितले.

डिझाइनमध्ये दोन मंडपही जोडले गेले आहेत, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की,पूर्वीच्या डिझाइनच्या आधारे कोरलेले सर्व खांब आणि दगड वापरले जातील. “फक्त दोन ‘मंडप’ जोडले गेले आहेत”

श्री सोमपुरा यांनी नमूद केले की राम मंदिराच्या बांधकामास सुमारे ३.५ वर्षे लागतील.

तीन दिवस चालणाऱ्या वैदिक विधींचे आयोजन भुमीपूजना पूर्वी करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या पायाभरणीसाठी ४० किलो चांदीची वीट बसविण्यात येणार आहे. ३ ऑगस्टपासून या विधींना प्रारंभ होईल.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त उशीर झालेल्या राम मंदिर भुमीपूजन कार्यक्रमास ५० हून अधिक व्हीआयपी सहभागी होऊ शकत नाही.

अयोध्येत विशाल सीसीटीव्ही पडदे लावले गेले आहेत जेणेकरून भाविककार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील.

उरणमधील नौदल स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

One reply on “कसा असेल अयोध्येचा भव्य राम मंदिर!”