Saket Gokhale – साकेत गोखले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी प्रस्तावित भूमिपूजनावर बंदी घालण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. साकेतची बरीच छायाचित्रे राहुल गांधींसोबत आहेत. साकेत गोखले यांनी राहुल गांधींचे अनेक ट्विटही पुन्हा रिट्विट केले आहेत.

असे सांगितले जात आहे की साकेत गोखले यांनी राहुल गांधी यांच्या आदेशानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि भूमीपूजन रोकण्याची मागणी केली आहे. ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी भूमीपूजनासाठी अयोध्येत जाणार आहेत.

साकेत गोखले यांनी भूमीपूजन कोविड -१९ च्या अनलॉक -२ च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे असे सांगितले. साकेत गोखले यांनी आपल्या याचिकेत असे म्हटले आहे कि कोविडच्या नियमांच्या विरोधात असणार्या भूमीपूजनमध्ये तीनशे लोक एकत्र येतील आणि ते नियमांचे उल्लंघन असेल.

साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पीआयएल पाठविले आहे. साकेत यांनी पत्र याचिकेतून भूमिपूजन कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, भूमिपूजन कार्यक्रमामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढेल.

साकेत गोखले यांनी संवाद साधताना स्वत:ला भाजपविरोधी असल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला ते कोणत्याही पक्षाशी निगडीत नसल्याचे सांगत होते.साकेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीही अपशब्द वापरले.

परंतु,अद्याप या पत्र याचिकेला मुख्य न्यायाधीशांनी सुनावणीसाठी मान्यता दिलेली नाही. राम मंदिर ट्रस्टबरोबरच केंद्र सरकारलाही या याचिकेचा पक्षकार बनवण्यात आला आहे.

कसा असेल अयोध्येचा भव्य राम मंदिर!

One reply on “राहुल गांधींचे निकटवर्तीय साकेत गोखले यांची राम मंदिर भूमीपूजन रोखण्यासाठी याचिका”