सोनू सूद म्हणाले की त्यांना ७५ वर्षीय वॉरियर आजी बरोबर प्रशिक्षण स्कूल सुरू करायचा आहे, ज्यांच्या जादूच्या लाठीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर ७५ वर्षांच्या वॉरियर आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. आणि बऱ्याच लोकांना तो आवडत ही आहे. अभिनेता सोनू सूदचा ही त्यांच्यामध्ये समावेश आहे.

तिच्या मार्शल आर्ट कौशल्याने प्रभावित होऊन, अभिनेता सोनू सूदने व्हायरल व्हिडिओला ट्विट करुन म्हटले आहे की, “कृपया तिची माहिती मला मिळू शकेल का? मला तिच्याबरोबर प्रशिक्षण स्कूल उघडायचे आहे जिथे ती आपल्या देशातील महिलांना काही आत्म-संरक्षण प्रशिक्षण देऊ शकेल,”.

त्याचे ट्विट येथे पहा:

सोनू सूद ट्विट

७५ वर्षांची ही महिला पुण्यातील आहे. कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी ती आपले कौशल्य दाखवते आणि रस्त्यावर पैसे गोळा करते. यापूर्वी रितेश देशमुख यांनीही वृद्ध महिलेचे कौतुक केले होते आणि तिचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्याने संपर्काचा तपशीलही विचारला आणि नंतर त्यांनी जाहीर केले की तो महिलेशी संपर्क साधण्यात यशस्वी झाला आहे.

रितेश देशमुख ट्विट

वयोवृद्ध महिलेचा व्हिडिओ सर्वप्रथम हातिंदर सिंग याने ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडिओ काही वेळातच खूप व्हायरल झाला. “पुण्यातील ही आजी ७५ वर्षांची आहेत. ती पोटासाठी पुण्यातील रस्त्यांवर लाठी कौशल्य दाखवते. या लॉकडाउनच्या काळातही तिला हे करण्यास भाग पडत आहे कारण असे वाटते की तिला स्वत:शिवाय इतर कोठूनही कमाईचा स्त्रोत नाही.” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटात सोनू सूद परप्रांतीयांना मदत करण्याच्या अविरत प्रयत्नांसाठी चर्चेत आहे.

राहुल गांधींचे निकटवर्तीय साकेत गोखले यांची राम मंदिर भूमीपूजन रोखण्यासाठी याचिका

One reply on “सोनू सूद उघडणार वॉरियर आजी सोबत ट्रेनिंग स्कूल”