रोहा(निखिल दाते) : धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित अंशुल स्पेशालटी मोल्युक्युलस या कंपनीच्या आवारात असलेल्या श्री गणेश मंदिरात  गेली अनेक वर्षे गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो या वर्षी कंपनी व्यवस्थापन व कामगार बांधवांकडून देशावर, राज्यावर व रोहे तालुक्यावर आलेले कोरोनारुपी संकट लवकर दूर व्हावे यासाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली .

सालाबादप्रमाणे​ या वर्षीही​ अंशुल च्या राजाचा उत्सव  भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्री. गणेश चतुर्थी निमित्त शनिवार दिनांक २२/०८/२०२० ते अनंत चतुर्दशी मंगळवार दिनांक ०१/०९/२०२० पर्यत  साजरा करण्यात येणार आहे.

यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाच्या सर्व​ नियमांचे पालन करून यंदाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचे या वर्षी आयोजन केले जाणार नाही.

रोज सकाळी ८ वा. सामाजिक व व्यक्तीगत अंतर राखून श्रीं.ची मनोभावे आरती केली जाणार आहे.

सन १९९५ पासुन अविरत अंशुलच्या  राजाचा उत्सव सुरू आहे. सुरुवातीच्या काळात अगदी साधेपणाने साजरा होणारा हा उत्सव  गेल्या १० वर्षांपासून अतिशय जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. उत्सवादरम्यान  भजने, कीर्तने व विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात.  कंपनीवर. येणारे कोणतेही विघ्न हे बाप्पामुळे दुर होतात हा दृढ विश्वास अंशुल परिवारामध्ये आहे.

उत्सवामध्ये वरिष्ठ व्यवस्थापन, कर्मचारी व कामगार या सर्वांचा सहर्ष सहभाग असतो.
या उत्सवाला अंशुलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.शिरिष सातपुते, उपाध्यक्ष श्री. एम.मुर्तुझा  , सरव्यवस्थापक श्री.लक्ष्मण शिट्याळकर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन असते अशी माहीती कंपनीचे एच. आर. विभागाचे वरिष्ठ आधिकारी श्री. किशोर तावडे यांनी दिली.

उरण जवळ ओएनजीसी ची पाईपलाईन फुटली; निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला