रोहा: रोहे तालुक्यातील मानाच्या गणपतींपैकी समजल्या जाणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथील भुवनेश्वरच्या राजाचे हे 20 वे वर्ष असून या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रशासनाचे प्रचलित नियम व अटींचे पालन करुन या वर्षीच्या उत्सवाचे नियोजन केले असल्याची माहीती मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष श्री. नितीन माने यांनी दिली.

धाटाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित व्ही बेल्ट बनवणारी कंपनी असलेल्या निरलॉन कंपनीच्या कामगार वसाहतीत कामगारांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, अत्यंत भक्तीपुर्ण आणि मांगल्यपुर्ण वातावरणात हा उत्सव येथे साजरा होत असे.

येथे रेखाटण्यात येणारी बोलकी आणि सुबक चलचित्रे भाविकांचे विशेष आकर्षण ठरत होती. काही वर्षानंतर निरलॉन कंपनी दुसऱ्या ग्रूपने टेकओव्हर केल्यानंतर अनेक कामगार स्थलांतरित झाले त्यानंतर 2001 पासून निरलॉन वसाहत व भुवनेश्वर परिसरातील हौशी गणेशभक्त तरुणांनी एकत्र येत ह्या उत्सवाची परंपरा चालू ठेवण्याचा निर्धार केला आणि अत्यंत उत्तम पद्धतीने गेली 19 वर्ष ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.

लोकवर्गणीतून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी परिसरातील सर्व नागरिकांचे दरवर्षी  चांगले सहकार्य लाभत असून या वर्षी कोव्हिडमुळे जास्त कोणतेही उपक्रम न राबवता साधेपणाने हा उत्सव होत असून कोरोनामुक्तीसाठी भुवनेश्वरच्या राजाच्या चरणी साकडे घालण्यात आले आहे.

उत्सव यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष नितीन माने यांच्या सक्षम नेत्रुत्वाखाली उपाध्यक्ष प्रविण शिर्के, सचिव दिपेश महाडीक, सह सचिव प्रथमेश घाग, खजिनदार महेश शिर्के, सह खजिनदार उमेश नाईक आदींसह सर्व कार्यकारिणी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १०० लोक अडकल्याची भीती