उरण गॅस टरबाइन पासुन जवळच असलेली विधंणे ग्रामपंचायत दररोज अंधारात; नागरीक संतप्त

उरण पुर्व विभागात असलेल्या विधंणे ग्रुप ग्राम पंचायत मधील गावांना तालूक्यात काेठेही फाॅल्ट असलातरी अंधारात रहावे लागते.

महावितरण चा अनागाेंदी कारभार आणि अपूऱ्या डागडूजी मूळे पावसाळ्यात सारखा विजपुरवठा खंडीत होत असतो. त्यात महावितरण च्या विजपुरवठा लाईनवर विधंणे ग्रुप ग्रामपंचायत शेवटची असल्याने कोठेही फाॅल्ट झाल्यास किंवा डागडुजी करावयाची असल्यास विजपुरवठा खंडित होतो.

सतत खंडीत होणारा विजपुरवठा आणि अस्थीर व्होल्टेजमुळे जवळजवळ बऱ्याच लोकांकडे ईनव्हरटर आहेत परंतू सलग २-३ दिवस विज खंडित होत असल्यामुळे ईनव्हरटरपण पुरत नाहीत. आणि ज्यांचे ईनव्हरटर नाहीत त्यांनी काय करायचे असा प्रश्न ग्रामस्थ करत आहेत.

लाॅकडाउन मध्ये काम, शिक्षण आणि बरचकाही ॲानलाईन झाल असल्याने विद्यार्थी, घरून काम करणारे आणि सर्वांचेच खुप हाल होत आहेत.

सारखा खंडित वीजपुरवठा आणि अस्थिर व्होल्टेज ह्यामुळे घरातील विजेची उपकरणे खराब होत असून हे बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण विक्रेत्यांना फायदा पोहचवण्यासाठी केले जाते असा स्थानिकांचा आरोप आहे.

सणांच्या दिवशी पण हीच परिस्थिती असल्याने गावकरी संतप्त झाले असून असच चालू राहिल्यास लवकरच उद्रेक होण्याची शक्यता आहे.

महावितरणच्या कंत्राटी कामांमध्ये कामाची गुणवत्ता घसरली असून थोड्याश्या वाऱ्या-पावसामध्ये विजेचे खांब उखडून पडतात आणि ते सुरळीत करण्यासाठी २-३ दिवस वीजपुरवठा खंडित होतो.

कंत्राटदारांना जेवढी कामे निघतील तेवढी चांगल असल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जात नाही तरी महावितरणने ह्या गोष्टी कडे लक्ष घालावे अशी ग्रामस्थांची विनंती आहे.

#महावितरण #Mahavitran #MSDECL #CMDMSEDCL

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची १५ व्या वेळी बदली