रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीत जवळपास ४५ कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली.

कोसळलेली ईमारत

दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे ७ वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ५० फ्लॅट होते असून २०० ते २५० लोक राहत होते. २०-२५ लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे आणि बचाव कार्य सुरु असून एनडीआरएफच्या ३ टीम पुण्यावरून रवाना झाल्या आहेत.

इमारत कोसळल्यामुळे मलब्याचा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला करुन नागरिकांना वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं असून हा ढिगारा उपसायला जवळपास २ दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास कोसळलेल्या ह्या इमारतीचं नाव ‘तारिख गार्डन’ असं होतं. स्थानिकांनी इमारतीचं बांधकाम निकृष्ठ असल्याचा आरोप केला आहे.

मंदिरातुन दानपेट्या आणि दुचाकी चोरण्यासाठी पनवेल येथून तिघांना अटक