पेण हे गणपतीच्या सुबक मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदाच्या कोरोना ह्या जागतिक विपत्तीमुळे बाजारात मंदी असून याचा परिणाम गणपती मूर्तींच्या व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे.
घाऊक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या तसेच परदेशात निर्यात होणाऱ्या गणपतीच्या मूर्तींची मागणी घटल्याने जवळजवळ ५0 कोटी रुपयांचा आर्थिक फटका गणेश मूर्ती व्यवसायाला बसला आहे. दरवर्षी जवळजवळ १५0 कोटी एवढी होणारी उलाढाल घसरून यंदा १00 कोटी वर आली आहे.
पेणच्या गणेशमूर्तींना जगभरातून विशेष मागणी असते. विशेषत: अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांमध्ये पेणच्या कारखान्यांमधून गणेशमूर्तींची निर्यात केली जाते. तसेच देशांतर्गत व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो.
फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पेणमधून परदेशात सुमारे ३० हजार गणेशमूर्तींची निर्यात केली जाते. मात्र यंदा याच कालावधीत जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली.त्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला.