शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पार्थ पवारांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट त्यांना निवेदन देऊन अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यावर पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले होते.

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून व्यक्त केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट मधून शरद पवार यांना प्रश्न विचारला आहे “स्वतःच्या नात्वाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?”

निलेश राणे ट्विट

“आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असा ट्विट करून आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे.

नितेश राणे ट्विट

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा पवार कुटुंबातील प्रश्न आहे, असं सांगत पवारांना टोला लगावला होता.

स्वातंत्र्यदिन सोहळाही होणार ऑनलाइन पद्धतीनेच साजरा