करोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळांचे वर्ग ऑनलाइन भरवण्यास सुरुवात झाली होती आणि आता यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळाही ऑनलाइन पद्धतीनेच साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला करोनायोद्धांना अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

यंदा स्वातंत्र्यदिनावर करोनाचे सावट असल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना विचारात घेऊन स्वातंत्र्यदिन ऑनलाइन साजरा करण्यात यावा. १५ ऑगस्टला होणाऱ्या या ध्वजवंदन सोहळ्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे आईवडील किंवा पत्नी यांच्याबरोबरच करोनायोद्धे व करोनावर मात करणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करण्याचे आदेशही शिक्षण निरीक्षक कार्यालयाने शाळांना दिले आहेत. कार्यक्रम सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यासाठी याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे.

बहिष्कारानंतर चीनची भारतातील निर्यात २४.७ टक्यांनी घसरली; व्यापारात १८.६ टक्क्यांची घट