दिग्गजांकडुन कौतुकाची थाप

रोहा: रोहे शहरातील प्रतिभासंपन्न साहित्यिक, वैशिष्ठ्यपुर्ण लेखनशैली व बहारदार सादरीकरणासाठी संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेल्या सौ. संध्या विजय दिवकर यांच्या मराठी गजल मुशायरा मधील सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक झाले असून राज्यस्तरावरील साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून त्यांना कौतुकांची थाप मिळाली आहे.

साहीत्यानंद प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार विजय वडवेराव यांच्या पुढाकाराने 25 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मराठी गजल मुशायराचे आयोजन करण्यात आले होते या मुशायरामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ, नंदुरबार, सांगली, सिंधूदुर्ग, उस्मानाबाद, रायगड आदी विविध ठीकाणच्या साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला होता.

या मुशायऱ्यामध्ये सौ. संध्या विजय दिवकर यांनी प्रस्तुत केलेल्या मुशायऱ्याचे सर्वत्र कौतुक झाले.

या आधीही सौ. संध्या दिवकर यांच्या साहित्याला वाचकांकडुन भरभरून प्रतिसाद मिळाला असून त्यांचे साहित्य वाचकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

भुवनेश्वरच्या राजाचे यंदाचे 20 वे वर्ष; कोरोनामुक्तीसाठी गणरायाच्या चरणी साकडे

One reply on “संध्या दिवकर यांच्या मराठी गजल मुशायरातील प्रभावी सादरीकरणाचे राज्यस्तरावर कौतुक”