रोहा (प्रतिनिधी)
ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त रोहे शहरातील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते, भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे व शहरातील सुप्रसिद्ध मुद्रण व्यावसायिक सचिन आठवले यांच्या शुभहस्ते सपत्नीक पूजा व अभिषेक अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

श्रावणी सोमवार पुजा

ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष श्री. हेमंत ओक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ब्राह्मण मंडळ रोहा कार्यकारिणीने कोव्हिडच्या अत्यंत आपत्कालीन परिस्थितीतही प्रशासनाचे नियम, अटी, शर्थी यांचे पालन करुन चारही सोमवारी उत्तम नियोजन केले,रोह्यातील वे. मू. दिपक बापट यांनी चारही सोमवारी पूजा व अभिषेकाचे पौरोहित्य केले.

देशावर, राज्यावर तसेच रोहे शहर व परिसरावर आलेले हे कोरोनारुपी संकट लवकरच दूर होऊ दे अशी मनःपूर्वक प्रार्थना यावेळी श्री ओंकारेश्वराच्या चरणी करण्यात आली.

राज्यपालांकडून बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन