देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काल अनेक बड्या नेत्यांची करोना टेस्ट पॉजीटिव्ह आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे करोनाबाधित असल्याचे वृत्त समोर आले. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंतच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे उत्तरप्रदेशाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचं रविवारी निधन झालं. लखनौमधील एसपीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 18 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सर्व करोनाबाधित झालेल्या नेत्यांनी त्यांच्या ‘संपर्कात आलेल्या लोकांनीही स्वत:ला क्वॉरन्टाईन करावं आणि गरजेनुसार कोरोना चाचणी करावी’, असे आवाहन केले आहे.