उरण मध्ये सुसज्य आणि अद्यावत रुग्णालय उभारले जावे यासाठी उरण सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. त्यामुळेच उरण साठी १०० खाटांच्या रुग्णालयासाठी भूखंड सुद्धा मंजूर झाला आहे. परंतु मागील ५ वर्षात तेथे कोणतेही काम झाले नाही. ह्यासाठी उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली.

आता कोरोनाच्या संकटात उरणमध्ये अद्यावत कोविड सेंटरची आवश्यकता असताना उरण मध्ये एक व्हेंटिलेटर मिळत नाही. उच्च न्यायालयाने जेएनपीटीला ट्रॉमा सेंटर उभारण्याचे आदेश दिल्या नंतर ट्रॉमा सेंटर स्थापन झाले पण साधनसामग्री उपलब्ध करण्यात आली नाही.

लॉकडाऊन मध्ये जेएनपीटीचे काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने बंद करण्यात आले नाही आणि त्याचाच परिणाम आता उरण मधील सर्व गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील जनतेचा उपचाराचा खर्च कंपन्यांनी करायला हवा आणि जेएनपीटी किमान १५ दिवस बंद ठेवावी अशी सुद्धा मागणी आहे.

वरील मागण्यानं साठी उरण सामाजिक संस्था १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहे अशी नोटीस जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जेएनपीटी चेअरमन याना देण्यात आली आहे. संस्थेला हे आंदोलन मंत्रालया समोर करायचे होते पण कोरोना पार्श्वभूमीवर उरण येथील पिरवाडी समुद्रीकिनाऱ्यावर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यन्त करण्यात येणार आहे.

आजोबा नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले: निलेश राणे