तहसिलदार उरण यांच्या अध्यक्षतेखाली उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज रुग्णालयसंदर्भात बैठक संपन्न झाली. बैठक सकारात्मक असून मा. तहसिलदार यांनी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाच्या पाठपुराव्यासाठी दर महिन्याला एक दोन वेळा मंत्रालयात येण्याची तयारी दाखविली आहे.
बैठकीत चर्चा झालेले मुद्दे पुढीलप्रमाणे.
- मा तहसिलदार यांनी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाच्या पाठपुराव्यासाठी दर महिन्याला एक दोन वेळा मंत्रालयात येण्याची तयारी दाखविली.
- ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून उरणमधील रूग्णालयासाठी 50 कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे.
- तालुक्यात 100 खाटांच्या रूग्णालयासाठी भूखंड मंजूर झाला आहे. त्या संदर्भातील अडचणी दूर करण्यास सिडको अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
- जेएनपीटीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यांचा निषेध करण्यात आला.
उद्या 15 ऑगस्ट रोजी – स्वातंत्र्यदिनी ठरल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून तालुक्यातील जनतेने रुग्णालयाच्या मागणीसाठी उद्या 15 ऑगस्टरोजी सकाळी 10. 30 वा. पिरवाडी बीचवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती उरण सामाजिक संस्थे मार्फत करण्यात आली आहे.
तहसिलदार यांनी उद्या पिरवाडी बीचवर येऊन आंदोलन कर्त्यांना आश्वस्त करण्याचे अभिवचन दिले आहे.
आजोबा नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले: निलेश राणे