आज दि.29 सप्टेंबर या जागतिक हृदय दिवसाचे औचित्य साधून स्वदेस फाऊंडेशन तर्फे हृदय शस्रक्रिया झालेल्या मुलांसोबत तसेच पालकांसोबत  डिजिटल झूम अँप  च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला.

या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, स्वदेस फौंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वोक्हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष चोखान्द्रे, स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंगेश वांगे, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव उपस्थित होते.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वदेस फॉउंडेशन तर्फे लहानमुलांच्या जन्मजात हृदयरोग तपासणी व शस्रक्रिया कार्यक्रमाचे  कौतुक केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले व हृदयाचे ऑपरेशन झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या.

  स्वदेस फौंडेशनने गेल्या पाच वर्षात फोर्टिस हॉस्पिटल, व्होकार्ट हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल  आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम- महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, तळा , म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड  या सात तालुक्यांमधील जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून जीवनदान दिले आहे. स्वदेस फाऊंडेशन मार्फत जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियासाठी आर्थिक मदत त्याचबरोबर हॉस्पिटलला जाण्या-येण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येते. तपासणीचा खर्च सुद्धा स्वदेसमार्फत केला जातो.  याचबरोबर पालकांना समुपदेशन करून, योग्य सल्ला देऊन पालकांना आधार देण्याचे काम स्वदेस करीत आहे. गेल्या पाच वर्षात 704 मुलांची तपासणी करण्यात आली असून 144 मुलांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन स्वदेस फॉउंडेशनचे आरोग्य व्यवस्थापक डॉ.सचिन अहिरे, सुधीर वाणी, भावना पांडे ,समीर मोरे,अर्जुन बनकर तसेच स्वदेस आरोग्य विभागाचे समन्वयक यांच्यामार्फत करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण – मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर