पनवेल: पेंधर येथील एक घर कोसळून तेथे राहणाऱ्या भाडेकरूच्या ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. महाड येथील इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना अशा प्रकारची दुसरी घटना घडली आहे.

पेंधर येथील उदयन पाटील यांच्या मालकीचा घरात मुन्नार हरिजन यांचे कुटुंब भाड्याने राहत होते. अचानक घराची भिंत पडल्याने संपूर्ण घर कोसळून अपघातात घरात झोपलेली हरिजन यांची ११ वर्षाची मुलगी हिना हिचा मृत्यू झाला आहे तर हंसिका, संतोष आणि अनपण हे तिघे जखमी झाले आहेत.

जखमींना श्री साई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच महानगर पालिका प्रशासन आणि पोलीस घटना स्थळी पोहोचले आहेत.

मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये जबरदस्ती मंदिर उघडले, १९ जणांवर गुन्हा दाखल