बेलपाडा गावचे समाजसेवक श्री अजित म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्गाची दस्तानफाट्याला क्रॉसिंग मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा शासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

सदर राष्ट्रीय महामार्ग हा दस्तानफाट्यावरून उपरी मार्गाने (एलिव्हटेड) ८ ते ९ मीटर उंचीवरून जाणार असून दस्तानफाटा येथे कोणतीही क्रॉसिंग देण्यात आलेली नाही त्यामुळे शेजारील गाव बेलपाडा, चिरले आणि उरण पूर्व विभागातील लोकांना उरणला व पनवेलला जाण्याकरिता १.५ ते
२ किलोमीटर लांबीचा पल्ला गाठून क्रॉसिंग करायला लागेल. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध, विकलांग आणि सर्वच लोकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

दस्तानफाटा – जासई येथे दररोज होत असणाऱ्या ट्राफिक जॅमवर तोडगा म्हणून ह्या एलिव्हटेड मार्गाचे काम सुरूकरण्यात आले परंतु हा मार्ग जनतेसाठी नवीन समस्या घेऊन येत असताना दिसत आहे.

https://timesofraigad.in/wp-content/uploads/2020/09/WhatsApp-Video-2020-09-11-at-4.06.19-PM.mp4
दस्तानफाटा ट्राफिक जॅम

आंदोलनाचा इशारा

जो राष्ट्रीय महामार्गावर दस्तानफाट्यावरुन जाणार आहे त्याला दस्तानफाट्यावर क्रॉसिंग मिळण्याकरीता झोपलेल्या प्रशासनाला व जे राष्ट्रीय महामार्गाचे सक्षम अधिकारी आहेत त्यांना जागे करण्याकरीता समाजसेवक अजित म्हात्रे यांनी दिनांक २१/९/२०२० रोजी दस्तानफाट्यावर पुन्हा एकदा प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

दस्तानफाटा

पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ