राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक, मासिक, त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण व टॉपअप अशा सर्व  प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण पूर्ववत सुरु करण्यात आले आहे.

या प्रक्रिया आगारातील बसस्थानकावरील स्मार्ट कार्ड वितरण केंद्रावर कोविड-19 बाबतच्या शासन निर्णयाचे पालन करुन करण्यात येणार आहे. इच्छुक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.

स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत ह्या आहेत रायगड जिल्ह्यातील प्रथम ३ ग्रामपंचायती

One reply on “राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु”