मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल

अत्यावश्यक सेवेसाठी आणि काही प्रमाणात बँक कर्मचाऱ्यांसाठी शासनाने रेल्वे सेवा सुरू केली आहे. परंतु मुंबई उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे ठाणे-मुंबई मार्गावर लोकल सेवा बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले.

मध्य रेल्वेने सकाळी त्यासंदर्भात ट्विट करून प्रवाशांना माहिती देऊन सतर्क केले होते. मुंबईतील सायन, मस्जिद आणि अन्य सखल भागात पाणी साचल्याने ठाणे- मुंबई सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, ठाणे-कल्याण मार्गावर अनिश्चित कालावधीत विशेष लोकल चालवण्यात आल्या. मात्र, त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.

ठाणे जिल्ह्यातही पहाटे 5 नंतर पावसाची संततधार होती, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंबिवलीमध्ये देखील चाकरमानी रेल्वे स्थानकात आले, आणि लोकल सेवा नाही म्हंटल्यावर त्यांनी परतीचा मार्गाने घरी जाणे पसंत केले.

शहरातील पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून खासगी कामगारांसाठी एसटी, आणि अन्य बस सेवा सुरू असतात त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रवाशांपेक्षा बसची संख्या अधिक क्षमतेने असल्याचे दिसून आले. रिक्षा व्यवसायाला देखील पावसामुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रवासी नाहीत तर पावसात ताटकळत राहण्यापेक्षा आरोग्याच्या कारणास्तव अनेकांनी घरी राहणे पसंत केले.

मध्य रेल्वेने मुंबईला येणाऱ्या व येथून सुटणाऱ्या बऱ्याच लांब पाल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच एलटीटी गुवाहाटी आणि मुंबई लखनऊ, मुंबई बेंगळुरू या विशेष गाड्यांचे वेळापत्रक रिशेड्युल करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे जाहीर करण्यात आली.

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर