दिवसेंदिवस उरण तालुक्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढतच आहे. याचाच फार मोठा परिमाण विंधणे गावावर ही झालेला आहे.

विंधणे गावात शासकीय आकडेवारीनुसार दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असताना शासनाने/ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.

विंधणे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्यामुळे गाव कोरोना मुक्त करण्यासाठी गावात कोरोनाबाबत जनजागृती व वैदयकीय तपासणीची आजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना राबवलेली दिसून येत नाही.

शासनाने/प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरच या सर्व गोष्टीकडे लक्ष वेधुन लवकरात लवकर योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात ही विंधणे गावातील स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.

खारघरमध्ये एटीएम तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अल्पवयीन मुलाला अटक