तांदूळ गरीब लोकांसाठी होता परंतु कर्नाटकातील एका टोळीने तो अवैधपणे आफ्रिकन देशांत निर्यात करून पैसे कमावले. नवी मुंबई येथील विशेष तपास पथकाने (एसआयटी) पीडीएस तांदूळ निर्यातीच्या रॅकेटचा भांडाफोड केला आणि पनवेलमधील पळस्पे येथे एका गोदामातून सुमारे ११० मेट्रिक टन तांदूळ जप्त केले. एसआयटीने तीन जणांना कर्नाटकमधून अटक केली आहे. जानेवारीपासून सुमारे ३२,००० मेट्रिक टन पीडीएस तांदळाची निर्यात केली होती.

त्यानंतर, नवी मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन केली ज्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तीन कंपन्यांवर छापा टाकला आणि आणखी तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून २०० मेट्रिक टन पीडीएस धान्यही जप्त केले. चौकशी दरम्यान असेही समोर आले आहे की जानेवारीपासून या रॅकेटने आधीच आफ्रिकी देशांना १०० कोटी रुपयांचे ३२८२७ मे.टन पीडीएस तांदूळ निर्यात केले होते.

कृष्णा पवार (वय ४५), नवनाथ राठोड (वय २५) आणि सत्तार सय्यद (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिका ऱ्याने सांगितले की, चौकशीत असे दिसून आले आहे की अवैध निर्यात रॅकेटमध्ये १८ लोकांचा सहभाग आहे आणि तीन जणांना अटक केल्यानंतर , आम्ही उर्वरित १५ आरोपींचा शोध घेत आहोत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील जय आनंद फूड कंपनी व खालापुरातील झेनिथ इम्पेक्स कंपनीकडून २७० मे.टन पीडीएस तांदूळ जप्त करण्यात आला आहे. “आमच्याकडे ५४०४ पोती तांदूळ आणि ८६० पोती गहू जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या पिशव्यांवर पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार म्हणून शिक्का आहे. ”

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान, बायोमेट्रिक यंत्रणा खबरदारीचा भाग म्हणून थांबविली गेली ज्याचा फायदा त्यांनी घेतला आणि पीडीएस धान्य बेकायदेशीरपणे आफ्रिकन देशांकडे वळविले. त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईत ८७,५०० रु किमतीच्या ड्रग्स सह दोन जणांना अटक