कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा स्थितीत जे विद्यार्थी स्मार्टफोन खरेदी करण्यास असमर्थ आहेत व त्यामुळे ते ऑनलाइन वर्गांना हजेरी लावू शकत नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारांनी स्मार्टफोन व योग्य संसाधने उपलब्ध करून द्यावीत, असे सांगण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे. राजस्थानच्या बांसवाडाचे खा. कनकमल कटारा यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात पोखरियाल म्हणाले की, गरीब विद्यार्थ्यांना डिजिटल सेवा प्रदान करण्यासाठी राज्य सरकारांनी सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत संसाधने पोहोचवावीत, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना संसाधनयुक्त बनविण्यासाठी नवीन शिक्षण धोरणातही राज्य सरकारांची भागीदारी महत्त्वाची आहे.

एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ई-पाठशाळा अ‍ॅपवर एनसीईआरटीची संपूर्ण पाठ्यसामग्री उपलब्ध आहे. सरकारच्या सांगण्यावरून मागील वर्षी एनसीईआरटीने ३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या टॅबवर ऑफलाइन मोडवर अपलोड केलेले आहेत.

समाजसेवक श्री.अजित म्हात्रे यांचे दिनांक 21/09/2020 रोजीच्या “चलो दस्तानफाटा“ या आंदोलनाचं सर्वेक्षण